Join us

'विवाहित पुरुष बायकोपासून लपवून...', कपिल शर्माच्या 'त्या' वक्तव्यामुळे मंदाकिनी झाली कावरीबावरी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 12:21 IST

The Kapil Sharma Show : नुकताच द कपिल शर्मा शोचा लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

कॉमेडियन कपिल शर्माचा शो खूप लोकप्रिय आहे. त्याच्या शोमध्ये बरेच कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आणि मुलाखतीसाठी जातात. कपिल शर्माच्या शोमध्ये यावेळी ८०च्या दशकातील तीन सुंदर अभिनेत्री पाहायला मिळणार आहेत. यात राम तेरी गंगा मैली फेम अभिनेत्री मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकरचा समावेश आहे. नुकताच द कपिल शर्मा शोचा लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये सर्वात आधी तिन्ही गेस्टचं स्वागत केले. त्यानंतर कपिल शर्मा मंदाकिनीबद्दल म्हणतो की, एक काळ होता जेव्हा तिच्यासाठी चाहते वेडेपिसे व्हायचे. लग्न झालेले पुरुष तर पत्नीला घाबरुन पाकिटात पत्नीच्या फोटोमागे मंदाकिनीचे फोटो लपवून ठेवत होते. हे ऐकल्यावर मंदाकिनी लाजून कावरीबावरी झाली.

मंदाकिनीनंतर कपिलने संगीता बिजलानीचीदेखील मस्करी करायला सुरुवात केली. तो म्हणाला की, संगीता यांच्या चित्रपटांचे शीर्षक गुन्हेगारीवर आधारीत होते जसे की कातिल, जुर्म, हथियार. त्यानंतर कपिलने तिला विचारलं की, तुला काय वाटतं की, चित्रपटाची स्क्रीप्ट लेखकाने लिहिली की तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगारांनी. हे ऐकून सगळ्यांना हसू आवरलं नाही.

त्यानंतर प्रोमोत कृष्णा अभिषेक जितेंद्र यांच्या गेटअपमध्ये एन्ट्री घेतो. तेही प्यार का तोहफा गाण्यावर थिरकत. त्यानंतर वर्षा उसगावकर यांना विचारतो की, तुम्ही २०००मध्ये लग्न केले होते. याउलट माझ्या नातव्याच्या मुंडणाला पाच लाखांचा खर्च आला. वर्षा यांनी २००० रुपये नाही तर २००० साली लग्न केले होते.
टॅग्स :मंदाकिनीकपिल शर्मा द कपिल शर्मा शोवर्षा उसगांवकर