Join us
Daily Top 2Weekly Top 5

...खुणावतोय ५0 कोटींचा आकडा

By admin | Updated: May 13, 2016 01:46 IST

‘सैराट’चे यश पाहता लवकरच मराठी इंडस्ट्रीला ५० कोटींचा आकडा खुणावत असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

मराठी इंडस्ट्रीला ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’, ‘टाइमपास’ असे एक से एक चित्रपट देणारा तगडा दिग्दर्शक रवी जाधव याने ‘सैराट’चे यश पाहता लवकरच मराठी इंडस्ट्रीला ५० कोटींचा आकडा खुणावत असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ‘‘हजारो मतमतांतरे, अनेक प्रकारची चांगली-वाईट समीक्षणे, व्हॉट्स अ‍ॅपवर पसरत असलेले उलटसुलट संदेश व पहिल्याच आठवड्यात झालेली पायरेसी या सर्व गोष्टींना टक्कर देत ‘सैराट’ हा चित्रपट या आठवड्यात अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीला खुणावत असलेला ५० कोटींचा आकडा अभिमानाने पार करेल, तो दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचा असेल. त्या वेळी तो दिवस संपूर्ण महाराष्ट्राने साजरा केलाच पाहिजे. तसेच गेल्या १० वर्षांत झालेला हा बदल असामान्य आहे व येणाऱ्या काळात मराठी चित्रपट शंभरच काय पण पाचशे कोटी पार करेल, याची ही नांदी आहे.