Join us

मराठमोळी शिल्पा शिंदे या अभिनेत्यासोबत बांधणार होती लग्नगाठ, पण तिने मोडला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:51 IST

Shilpa Shinde : शिल्पा शिंदेने मोडलेल्या साखरपुड्यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) आणि रोमित राज (Romit Raj) १५ वर्षांपूर्वी लग्न करणार होते, मात्र एंगेजमेंटनंतर दोघांनीही आपला निर्णय बदलला, त्यानंतर दोघेही बरेच महिने चर्चेत राहिले. तिच्या अचानक साखरपुडा मोडल्याच्या बातमीने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला. जरी दोघेही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असले तरी २००७ मध्ये या जोडप्याची तुटलेले नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या रोमित राज 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये रोहितची भूमिका साकारत आहे. १५ वर्षांनंतर शिल्पा शिंदेसोबतचे लग्न तुटल्याबद्दल त्याने आता प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शिंदे आणि रोमित राज यांच्यात प्रेम २००७ मध्ये त्यांच्या 'मायका' शोच्या सेटवर फुलले होते. २००९ मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली होती आणि लग्नाची तयारीही सुरू होती. मात्र, शिल्पा शिंदेचे मन बदलले आणि लग्न मोडले. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, शिल्पा शिंदेने एंगेजमेंट मोडण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, त्यावेळी तिला वाटले की आपण लग्नासाठी खूप लहान आहोत आणि आई-वडील आणि नातेवाईकांच्या दबावानंतरही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शिल्पाने 'बिग बॉस ११' मधील तिच्या कार्यकाळात सांगितले की रोमितच्या कुटुंबाच्या खूप अपेक्षा होत्या. या कारणामुळे तिने साखरपुडा मोडला.

शिल्पासोबतच्या साखरपुडा मोडला त्यावर रोमित राज म्हणाला...रोमित म्हणाला, '१५ वर्षे झाली आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांना पाहिले नाही. मी एवढेच म्हणेन की जे काही झाले ते चांगल्यासाठी झाले. अलीकडेच 'खतरों के खिलाडी १४' या रिॲलिटी शोमधून बाहेर काढण्यात आलेली शिल्पा याआधी 'बिग बॉस ११'ची विजेती राहिली आहे. बिग बॉसमध्ये असताना तिला लोकांकडून खूप पाठिंबा मिळाला, परंतु विकास गुप्ता आणि हिना खान यांच्याशी संबंधित वादांमध्येही ती अडकली. तर रोमित सध्या स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये रोहित पोद्दारच्या भूमिकेत दिसत आहे.

टॅग्स :शिल्पा शिंदेबिग बॉस