Join us

Video: परांजपेंसोबतचं लग्न मोडून नेहा थाटणार यशसोबत संसार? मालिकेत येणार पुन्हा नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 18:00 IST

Majhi tujhi reshimgath: यश, परांजपेंचं पितळ उघडं पाडणार आहे. इतकंच नाही तर भर मांडवात नेहा हे लग्न मोडणार असून परांजपेंच्या कानशिलात लगावणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या चांगलीच रंजक वळणावर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नेहा आणि परांजपे यांच्या लग्नाची गडबड सुरु होती. आणि, अखेर ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. एकेकडे लग्नानंतर नेहाचं घर मिळणार म्हणून परांजपे खूश आहेत. तर दुसरीकडे मात्र, नेहा केवळ परी आणि काका-काकुंचा विचार करुन या लग्नासाठी तयार झाली आहे. परंतु, आता या मालिकेत पुन्हा एक नवा ट्विस्ट येणार आहे. घर मिळवण्यासाठी परांजपेंनी आखलेला प्लॅन नेहाला समजणार आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये यश परांजपेंचं पितळ उघडं पाडणार आहे. इतकंच नाही तर भर मांडवात नेहा हे लग्न मोडणार असून परांजपेंच्या कानशिलात लगावणार आहे.

दरम्यान, अलिकडच्याच भागात नेहाचं घर खरेदी करण्यासाठी एक जोडपं येतं. याविषयी परी नेहा, काकू आणि शेफालीला सांगायचा प्रयत्न करते. मात्र, तिचं कोणीही ऐकायला तयार होत नाही. त्यामुळे परी तिच्या फ्रेंडला म्हणजेच यशला व्हॉइस मेसेज पाठवून घरी प्रॉब्लेम झाल्याचं सांगते. परीचा हा मेसेज पाहिल्यावर यश दुबईवरुन थेट मुंबई गाठतो. इतकंच नाही तर सोबत परांजपेंचा डाव उधळूनदेखील लावतो. त्यामुळे निदान आता तरी यश त्याच्या प्रेमाची कबुली देणार का? नेहा पुढे कोणता निर्णय घेणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे