Pooja Birari Video: 'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय असलेली मालिका आहे. अगदी अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांची फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळते आहे. शिवाय संग्राम साळवी, नीना कुलकर्णी, आतिशा नाईक अशी तगडी कलाकार मंडळीमालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत दिवसेंदिवस येणारे नवे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. अशातच नुकतीच अभिनेत्री पूजा बिरारीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याचं कारणही खास आहे.
पूजा बिरारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट तिचा सहकलाकार विशाल निकमसोबत व्हिडीओ शेअर करत त्याला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, "मी भाग्यवान आहे की एका उत्तम सहकलाकारात मला एक चांगला मित्र सापडला! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..., अनेक दिवस ड्राफ्ट मधली पेंदीग रील आज finally पोस्ट करता आली ह्याचा तुला आनंद देण हेच माझ तुला बर्थडे गिफ्ट. "
पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "बाकी तू टेन्शन घेऊ नको - मैं टेन्शन लेताही नही हे चालूच राहील, आणि हो पुढच्या वेळी जेव्हा सांगवीला येशील तेव्हा तुला जेवणासाठी नक्कीच आमंत्रित करेन. राया-मंजिरीची ऑनस्क्रीन विरोधी ऑफस्क्रीनवरील मजा. " असं मजेशीर कॅप्शन अभिनेत्रीने व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर विशालने रिप्लाय देत म्हटलंय, " थॅंक्यू सो मज पूजा..., मी सुद्धा खूप लकी आहे तुझ्यासारखी उत्तम कलाकार आणि तितकंच भारी व्यक्तीमत्व असणारी सहकलाकार आणि मैत्रीण मिळाली…".