Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक शेवट...", 'पारु' फेम श्वेता खरातची भावुक पोस्ट; मालिकेच्या सेटवरचे फोटो शेअर करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:13 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेली 'मन झालं बाजिंद' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री श्वेता राजन खरात घराघरात पोहोचली.

Shweta Kharat: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेली 'मन झालं बाजिंद' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री श्वेता राजन खरात घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. सध्या श्वेता राजन झी मराठी वाहिनीवरील पारु मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आली होती. अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक तसंच प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पारुमध्ये श्वेताने साकारलेलं अनुष्काचं हे खलनायिकेचं पात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरलं. परंतु, कथानकानुसार अनुष्का हे पात्र ‘पारू’ मालिकेतून एक्झिट झाली आहे. याच संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्वेता खरातने पोस्ट शेअर केली आहे.

श्वेता खरात सोशल मीडियावर  कायमच सक्रिय असते. अलिकडेच अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पारू मालिकेतू आपली एक्झिट झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते देखील नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.  त्यात आता अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये श्वेताने लिहिलंय की, "अनुष्का म्हणून निरोप घेत आहे. ज्या खलनायिकेचा तुम्हाला तिरस्कार करायला खूप आवडायचा. ते गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक पात्र साकारण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे.

पुढे अभिनेत्रीने लिहिलं, "माझ्या खलनायिका व्यक्तिरेखेला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद आणि एक अविश्वसनीय प्रेक्षक असल्याबद्दल धन्यवाद. हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय प्रवास होता. पण प्रत्येक शेवट एका नवीन सुरुवातीकडे घेऊन जातो..." #तुमचीच अनुष्का..., अशी भावुक करणारी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडिया