Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुरांबा' फेम अभिनेत्रीची स्टार प्लसवरील 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; अभिनयाला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:33 IST

मुरांबा' (Muramba) ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे.

Meera Sarang: 'मुरांबा' (Muramba) ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. रमा-अक्षय हे जोडपे प्रेक्षकांचं अत्यंत लाडकं जोडपं बनलं आहे. मालिकेत शशांक केतकर अक्षय मुकादम नावाचं पात्र साकारतोय तर शिवानी मुंढेकर ही रमा आणि माही अशा दुहेरी भूमिकेत दिसतेय. याशिवाय मुरांबामध्ये अभिनेत्री मीरा सारंग आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. मीरा मालिकेत जान्हवी मुकादम ही व्यक्तिरेखा साकारते आहे. तिचं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अशातच अलिकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

मीरा सारंग मराठी मालिकाविश्व गाजवल्यानंतर आता हिंदी मालिकेत एन्ट्री घेतली आहे. स्टार प्लसवरील लोकप्रिय असलेली 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत मीराने माहिती दिली आहे. नवी सुरुवात, दिपाली चव्हाण... पाहत राहा गुम है किसी के प्यार में अशा आशयाची पोस्ट मीरा सारंगने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे मीरा हिंदी मालिकेतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना दिसणार आहे. पण, आता मीरा मुरांबा मध्ये दिसणार की नाही याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 

मीरा सारंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने 'मुरांबा' या मालिकेच्या आधी 'काव्यांजली' या मालिकेत काम करताना दिसली. तसेच तिने 'दुनियादारी फिल्मी ईश्टाइल' या मालिकेतही काम केले आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया