Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पहिली स्पेशल होतीच पण दुसरी खास आहे...", मराठी अभिनेता कोणाबद्दल बोलतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:43 IST

नव्याने प्रवास सुरु! 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी, सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव 

Sanjay Patil: प्रत्येकाचं आपलं एक हक्काचं घर असावं तसंच हक्काची गाडी असावी असं स्वप्न असतं. मागील काही दिवसांमध्ये मराठी कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनी स्वत: चं घर घेतलं तर काहींनी नवीकोरी गाडी विकत घेत स्वप्न साकार केलं. विशाखा सुभेदार, जान्हवी किल्लेकर गौरव मोरे तसेच देव्रेंद्र गायकवाड या कलाकांराची नवीन गाडी घेत स्वप्नपूर्ती केली. आता या यादीमध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. हा अभिनेता म्हणजे संजय पाटील आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून अभिनेता संजय पाटील हा घराघरात पोहोचला. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत संजय पाटील हा उदय शिर्के पाटील या भूमिकेत पाहायला मिळाला. अशातच नुकतीच अभिनेत्याने Maruti Suzuki S-Cross ही नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची एकूण किंमत जवळपास १२ लाख इतकी आहे. सोशल मीडियावर संजय पाटीलने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. "पहिली स्पेशल होतीच पण दूसरी खास आहे......... कार! घेतली बरं का! नव्याने प्रवास सुरू...., जीवनाच्या नवीन पर्वात काहीतरी छान आणि मनासारखं." असं लक्षवेधी कॅप्शन देऊन अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, अभिनेता संजय पाटीने शेअर केलेल्या या पोस्टवर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील सहकलाकार म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू, मंदार जाधव, कपिल होनराव आणि माधवी निमकर या कलाकारांनी अभिनेत्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत  शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

वर्कफ्रंट

संजय पाटीलच्या कामाबद्दल सांगायचं तर 'बापमाणूस', 'विठू माऊली' अशा मालिकेत तो झळकला. याशिवाय 'सुख म्हणजे नक्की काय असतं', क्राईम पेट्रोल यांसारख्या मालिकांमधूनही त्याने काम केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया