Join us
Daily Top 2Weekly Top 5

धकधक गर्लला काम करायचंय मराठी चित्रपटात

By admin | Updated: December 13, 2015 00:43 IST

धकधक गर्ल माधुरी दीक्षितकडून कायमच एक प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. तसेच या प्रश्नाच्या उत्तराची वाट संपूर्ण महाराष्ट्रदेखील पाहत आहे. इतकेच नाही तर तिच्याही लाइफचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षितकडून कायमच एक प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. तसेच या प्रश्नाच्या उत्तराची वाट संपूर्ण महाराष्ट्रदेखील पाहत आहे. इतकेच नाही तर तिच्याही लाइफचा तो टॉप वन प्रश्न नक्कीच ठरला आहे. तो प्रश्न असा, की माधुरी मराठी चित्रपटात काम कधी करणार? या प्रश्नाला फुलस्टॉप देण्याची वेळ आता आली आहे. कारण माधुरी दीक्षित स्वत:च म्हणते, ‘‘कट्यार काळजात घुसली’ हा मराठी चित्रपट पाहून मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली आहे. पण अद्याप कोणतीही फिल्म माझ्यापर्यंत आली नाही.’’कट्यार काळजात घुसली हा चित्रपट पाहून भारावलेली माधुरी म्हणते, ‘‘लहानपणी कट्यार काळजात घुसली हे नाटक पाहिलं होतं. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा चित्रपट पाहायला गेले; पण मन मोहवून टाकणारा अनुभव पाहायला मिळाला. या चित्रपटात शंकर महादेवनचा सहज असणारा वावर कायम लक्षात राहील असा आहे. पंडितजींच्या भूमिकेत शंकर खूप स्वीट दिसत असून त्यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तसेच ‘घेई छंद मकरंद’ हे गाणं ऐक णं म्हणजे मनाला उत्साह व प्रेरणा देणारं आहे. मराठी चित्रपटात हे होणारे बदल नक्कीच मराठी इंडस्ट्रीला एका यशस्वी शिखरावर पोहोचविणारे आहेत. माधुरीने आता मराठीत काम करायची इच्छा तर व्यक्त केली आहे, बघूया आता कोण तिच्या मनासारखी स्क्रिप्ट तयार करू शकते?