Join us

हास्यजत्रेचा चौकार; आठवड्यातून ४ दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 19:30 IST

Maharashtrachi hasya jatra: या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य झाला आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे.  

ठळक मुद्देयेत्या २० सप्टेंबरपासून सोमवार ते गुरुवार महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या कार्यक्रमाने केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच केलं नाही. तर या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य झाला आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे.  विशेष म्हणजे आता हा कार्यक्रम आठवड्यातून चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

येत्या २० सप्टेंबरपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आठवड्यातून चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. इतकंच नाही तर कार्यक्रमातील कलाकारांमध्येदेखील आनंदाचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे गायक रोहित राऊतने एक रॅप सॉन्ग सादर केलं असून हास्यजत्रेचा चौकार म्हणत कलाकारांनी तुफान डान्स केला आहे.

दरम्यान, येत्या २० सप्टेंबरपासून सोमवार ते गुरुवार महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतील इतर कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटीप्रसाद ओक