Join us

थिएटरमध्ये सैराट प्रेक्षक झाले झिंगाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 14:28 IST

  सैराटच्या पहिल्या प्रोमो साँगपासुनच प्रेक्षक थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर ती गाणी पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. याड लागल ग याड लागल गं असो किंवा झिंग झिंग झिंगाट या गाण्यांची

            सैराटच्या पहिल्या प्रोमो साँगपासुनच प्रेक्षक थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर ती गाणी पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. याड लागल ग याड लागल गं असो किंवा झिंग झिंग झिंगाट या गाण्यांची जादु तरुणांवर चढलेली होती. डीजे वर अन पार्ट्यांमध्ये थिरकवायला लावणाºया या गाण्यांच्या नशेमध्ये तरुणांसह सगळेच प्रेक्षक डुबून गेले होते. सिनेमा काल प्रदर्शित झाला अन तिकीटांसाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी थिएटर बाहेर पहायला मिळाली. हाऊसफुल्लच्या पाट्या सिनेमागृहांच्या बाहेर झळकल्या अन आपल्याला तिकीट मिळावे म्हणुन अ्क्षरश: थिएटर बाहेर तग धरुन बसलेले लोक पहायला मिळाले. या सैराटची जादु आज सगळीकडेच पहायला मिळत आहे.                 झिंगाट गाण्याचे शब्द अन ताल कानावर पडताच आपोआप पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत. पण प्रेक्षकांनी तर कहरच केला थिएटरमध्ये झिंगाट गाणे चालु झाले अन सगळ््या थिएटरमध्ये एकच कल्ला सुरु झाला. प्रेक्षकांनी खुर्च्यांवर चढुन शिट््या वाजवत एकदम झिंगाट डान्स केला. एवढाच नाही तर स्टेजवर पडद्यापाशी जाऊन तरुणांनी डान्स करीत एकदमच गोंधळ घातला. हे चित्र फक्त पुण्या-मुंबईतच नाही दिसले तर महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गावातील थिएटर्समध्ये देखील पहायला मिळाले आहे. मराठी चित्रपटाला अशा प्रकारचा मिळणारा रिसपॉन्स पाहता आपला चित्रपट दर्जेदार होतोय अन प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय हे मात्र नक्की.