Join us
Daily Top 2Weekly Top 5

तू आणि मी...चित्रपटाचे गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 14:01 IST

मुकेश मलिक दिग्दर्शित तो आणि मी हा आगामी चित्रपटातील इश्काच्या नशेची हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं बॉलिवुडची तगडी गायिका सुनिती चौहान हिच्या आवाजातील आहे. तसेच स्मिता गोंदकर हिच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे.

Exculsive -  बेनझीर जमादार   मुकेश मलिक दिग्दर्शित तो आणि मी एक ऋणानुभव हा आगामी चित्रपटातील इश्काच्या नशेची हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं बॉलिवुडची तगडी गायिका सुनिती चौहान हिच्या आवाजातील आहे. तसेच स्मिता गोंदकर हिच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री गिरीजा जोशी ही नवीन जोडी पहिल्यांदाच एकत्रित पाहायला मिळणार आहे. तर या चित्रपटात श्वेता शिंदे, प्रसाद ओक, प्रसाद पंडीत, ज्योती म्हाळसे, माधव वझे, दिप सुतार या कलाकारांचा देखील समावेश आहे. तो आणि मी ही एक प्रेमकथा असून या चित्रपटाची निर्मिती यश क्रिएशन्सच्या बॅनर अंतर्गत अंकुश सुतार यांनी केली आहे. तर या चित्रपटाची कथा सुनिल हरिश्चंद्र यांनी लिहिली आहे.