Join us

कोण आहे ही मराठी बाला जीला पाहून कलेजा खलास झाला,ओळखा कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 16:29 IST

मराठीची हॉट बेब सई ताम्हणकरने अशाच एका बेटावर बिकनी घालुन पुढे धोका म्हणत तरूणाईला अक्षरक्षः वेड लावलं होते.गुलाबी रंगाची ...

मराठीची हॉट बेब सई ताम्हणकरने अशाच एका बेटावर बिकनी घालुन पुढे धोका म्हणत तरूणाईला अक्षरक्षः वेड लावलं होते.गुलाबी रंगाची बिकनी घालत सईने अक्षरश: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले. रिल लाईफ असो किंवा मग रिअल लाईफ नेहमीच ती तिच्या वेगवेगळ्या स्टायलिश लूकने रसिकांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळते.ग्लॅमरस अंदाज असो किंवा मग तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो.म्हणूनच सध्या सईच्या या फोटोतल्या अदांनी सा-यांना वेड लावलंय.सईने केलेल्या या फोटोशूटमध्ये तिची एकेक सेक्सी अदा कॅमे-यात कैद झालीय असल्याचे पाहायला मिळतंय.ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सई प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे.मराठी सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर आता सई दाक्षिणात्य रसिकांची मनं जिंकण्यासाठीही सज्ज झाली आहे.तिथल्या संस्कृतीच्याही प्रेमात पडल्याचं सई दिलेल्या एका मुलाखतीत आवर्जून सांगत असते.सोलो हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजोय नामदार यांनी केले आहे तर डलकर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचसोबत डिनो मोरिया, नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण कोचिन तर काही चित्रीकरण मुंबईत आणि लोणावळ्यात झाले आहे. या चित्रपटात सईची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. सोलो या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करत सईनेच तिच्या फॅन्सना ही बातमी दिली होती. सध्या सईची मराठी फॅन्समध्ये फक्त सई ताम्हणकरचीच हवा आहे.रुपेरी पडद्यावरील मैत्रीची गोष्ट सांगणारी दुनियादारी रसिकांना चांगलीच भावली होती. संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या सिनेमाच्या कथेने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं होतं.अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर,अभिनेता अंकुश चौधरी,जितेंद्र जोशी,उर्मिला कोठारे यांच्या अभिनयानं सिनेमा सिनेमाच्या कथेला वेगळं परिमाण मिळवून दिलं होतं.'दुनियादारी' या सिनेमाच्या यशानंतर संजय जाधव यांचे 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'गुरु','तू ही रे' असं सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले होते.या प्रत्येक सिनेमात संजय जाधव यांचे लाडके स्वप्नील, सई आणि अंकुश हे कलाकार होते. त्यामुळे सोशल मीडियावर दुनियादारीच्या सिक्वेलच्या चर्चांना उधाण आले आहे. Also Read:टीम 'दुनियादारी'ची अशीही रियुनियन.. 'दुनियादारी'चा सिक्वेल येणार?