Join us

​प्राजक्ता माळी हंपीत करतेय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 13:35 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या कर्नाटकातील हंपी या सुंदर ऐतिहासिक ठिकाणी चांगलीच धमाल-मस्ती करताना दिसत आहे. परंतू प्राजक्ता काही हंपीत ...

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या कर्नाटकातील हंपी या सुंदर ऐतिहासिक ठिकाणी चांगलीच धमाल-मस्ती करताना दिसत आहे. परंतू प्राजक्ता काही हंपीत ट्रीपसाठी गेलेली नाही तर ती एका चित्रपटाचे चित्रीकरण हंपीमध्ये करत आहे. दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती हंपीला गेली आहे. या चित्रपटाचे तर शूटिंग सुरुच आहे. परंतू प्राजक्ता मात्र इथे भरतनाट्यमचे फोटोशूट करताना देखील पाहायला मिळतेय. भरतनाट्यमची साडी घालुन साज-शृंगार केलेल्या वेषात तिने हंपीच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये स्वत:ला कॅमेºयात बंदिस्त करुन घेतले आहे. नुकतेच तिने हे फोटो देखील सोशलसाईट्सवर शेअर केले आहेत. प्राजक्ताने या फोटोविषयी लोकमत सीएनक्सशी बोलताना सांगितले की, मला भरतनाट्यम करायला फार आवडते. हंपी मधील लोकेशन्सच एवढी भारी आणि भन्नाट आहेत की मी तिकडे शूटिंगसाठी जातानाच भरतनाट्यमचा एक कॉश्चुम घेऊन गेले होते. हा काही चित्रपटाचा भाग नाही. एक हौस म्हणुन मी या वेशभूषेतील काही फोटोज क्लिक केले आहेत. या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर आणि प्रियदर्शन जाधव यांच्या देखील भूमिका आहेत. पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये हंपीचे सौंदर्य प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एका वेगळ््या विषयावरील हा सिनेमा असल्याचे प्रकाश कुंटे यांनी सांगितलेच हाते. प्राजक्ताची एक महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात असल्याचे कळतेय. सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. नुकतेच प्राजक्ताने या चित्रपटाचे हंपीतील चित्रीकरण पूर्ण केले आहे.  प्राजक्ताने सोशल साईट्सवर हंपीतील काही शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एकदमच कुल लुकमध्ये दिसत आहे. आता चित्रपटात देखील ती याच लुकमध्ये दिसणार का? हे मात्र अजुन तरी समजलेले नाही.