Join us

अवधुत गुप्तेला काय आवडते चालवायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 15:50 IST

आपल्या आवडत्या कलाकाराच्या आवडी-निवडी जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. असाच आपला महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक अवधुत गुप्ते याला देखील ...

आपल्या आवडत्या कलाकाराच्या आवडी-निवडी जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. असाच आपला महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक अवधुत गुप्ते याला देखील काय चालवायला आवडत असेल याच्या प्रतिक्षेत त्याचे चाहते असणार हे नक्कीच. आजकालचे वातावरण पाहता कोणाला ही विचारले तूला चालवायला काय आवडेल तर साहजिकच कोणी म्हणेन बुलेट, निंजा,बीएमडब्लू, आॅडी, मरसडीज असे उत्तर येईल. पण आपल्या आवाजाने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडणारा अवधुत म्हणतो, कार, बुलेट, सायकल हे सर्व काय असले तरी मला डोक चालवायला फार आवडतं. वाटतं ना काहीतरी गंमतीशीर. असो गंमत असली तरी अवधुतला गाडया-घोडयांपेक्षा डोकं चालवायला आवडत असल्याचे त्याने खुद्द सोशलमिडीयवर शेअर केले आहे. तसेच हे सांगताना त्याने फोटो देखील लय भारी मुद्दयाला सुटेबल होईन असाच अपलोड केला आहे. डोक्यावर हॅट व मस्त विचारात डोक चालविण्याचा फोटो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. त्याच्या या गंमतीशीर गोष्टीला त्याच्या चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.  मुद्दा विनोदाचा जरी असला तरी, अवदुतच्या हया क्लृप्तीची दाद दिली पाहिजे हे नक्की.