Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेता, अभिनेत्रीने केला साखरपुडा, या अभिनेत्याची पहिली बायको आहे टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 18:06 IST

साखरपुड्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांचे चाहते त्यांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

मराठी अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली झंकारने साखरपुडा केला असून रुपालीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांचे चाहते त्यांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

रुपालीने तिच्या आणि विजयच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, पहली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुमनैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावनशर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये...सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये..

विजयचे पहिले लग्न अभिनेत्री पुजा पुरंदरेसोबत झाले होते. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. पण हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. पुजा सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. 

विजयने 'ढोल ताशे', 'मी एंड मिसेस सदाचारी', '702 दिक्षित' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे तर रुपालीने झी मराठीच्या लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेत काम केले होते. 

टॅग्स :मराठी