Join us  

वीणा जामकर करतेय भोरमध्ये चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 6:30 AM

अभिनेत्री वीणा जामकर सध्या पुण्यातील भोरमध्ये चित्रीकरण करते आहे. याबाबतची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे.

ठळक मुद्देवीणा जामकर दिसणार सयाजी शिंदेसोबत चित्रपटातचित्रपटाचे नाव व कथानक अद्याप गुलदस्त्यात

नाटक, चित्रपट व मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वीणा जामकर सध्या पुण्यातील भोरमध्ये चित्रीकरण करते आहे. याबाबतची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे.वीणाने तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करीत आपल्या चाहत्यांना शुभ संध्याकाळ म्हटले आहे. या फोटोमध्ये तिने साडी नेसली असून हातात हिरव्या बांगड्यादेखील आहेत. 

यापूर्वी विणाने भोरमधील चित्रीकरणादरम्यानचा फोटो शेअर केला होता. त्यात ती चहा बनवताना दिसते आहे. तिने त्यात लिहिले की, सेटवर चहाचा ब्रेक झाला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याचेही तिने नमूद केले आहे. 

याच सेटवरील तिने आणखीन फोटो शेअर केला होता. त्यात तिच्यासोबत मराठी व दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे दिसत आहेत. या फोटोसोबत विणाने पोस्टमध्ये लिहिले की, सयाजी शिंदे सरांसोबत काम करण्याचे अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले. फक्त दोन सीन्स आणि आयुष्यभर पुरेल एवढे प्रशिक्षण मिळाले.  

वीणा सध्या भोरमध्ये कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण करते आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. आता ती तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत कधी घोषणा करते, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. वीणा जामकर गेल्या वर्षी लालबागची राणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती आणि या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले होते.  वीणा जामकरने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत. पण ती पहिल्यांदाच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. ती रमाई या चित्रपटात रमाबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :वीणा जामकरसय्याजी शिंदे