उर्मिलाचा मॉर्डन पारंपारिक लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 09:23 IST
गुरू, प्यारवाली लव स्टोरी, टाईमपास २, दुनियादारी यासांरख्या ब्लॉकबास्टर चित्रपटांमध्ये धुवादार अभिनय करणारी प्रेक्षकांची लाडकी मँगो डॉली म्हणजे उर्मिला ...
उर्मिलाचा मॉर्डन पारंपारिक लूक
गुरू, प्यारवाली लव स्टोरी, टाईमपास २, दुनियादारी यासांरख्या ब्लॉकबास्टर चित्रपटांमध्ये धुवादार अभिनय करणारी प्रेक्षकांची लाडकी मँगो डॉली म्हणजे उर्मिला कानिटकर - कोठारी चा हा फ्यूजन लूक पाहिल्यावर खरचं कोणीही तीला माशाअल्लाह बोलेल. उर्मिलाचा हा लूक पाहिल्यावर तुम्हाला बॉलिवूड मधल्या रेखाची आठवण करून देईल हे नक्की... रेखाचा आणि उर्मिलाचा हा लूक सेम सेम तर वाटत नाही ना? रेखा प्रत्येक इव्हेंट मध्ये आपल्याला नेहमी भरजडीत साड्या व डार्क मेकप मध्ये दिसते. त्याचप्रमाणे उर्मिलाही या फोटोमध्ये रेखा सारखीच काहीशी दिसत आहे. उर्मिला ने पारंपारिक व मॉर्डन लूक मध्ये लेटेस्ट फोटो शूट केले आहे. या फोटो मध्ये ती पारंपारिक अटायर मध्ये दिसत असून तिने केसांमध्ये सिंदूर सुद्धा भरले आहे. परंतू या पारंपारिक लूक ला कोट्रास्ट मॉर्डन लूक येण्यासाठी तीने गडद रंगाची लाल लिप्सीट, नाकामध्ये मोठी रिंग व हातात मेटल च्या बांगड्या घातल्या आहेत. त्यामुळे तिचे हे सौंदर्य आणखी खुलले आहे. त्यामुळे खरचं ही मँगो डॉली या फोटोमध्ये माशाअल्लह दिसत आहे.