Join us

चहाच्या मळ्यात रमली ही अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 15:32 IST

या अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देउर्मिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

उर्मिला निंबाळकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून विविध मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दिया और बाती, मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत तिनं काम केलं आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावरील 'दुहेरी' ही मालिका चांगलीच गाजली होती.

उर्मिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या फोटोत ती चहाच्या मळ्यातून दिसत असून ती या मळ्याच्या प्रेमात पडली आहे. तिने या फोटोसोबत लिहिले आहे की, मी अक्षरशः झोपेतून उठले आहे. पण तरीही मला झोप येत आहे. या झाडांना अलिंगन द्यावे असे मला वाटत आहे.

उर्मिलाने पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर फॅशन डिझायनरचं शिक्षणही तिनं घेतलं आहे. अभिनयाबरोबरच ती ट्रॅव्हलिंग आणि इतर विषयावरील व्हिडिओ ब्लॉग करते. तिने एक तारा, हायवे आणि सनई चौघडे यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे. उर्मिला नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट अँड बोल्ड फोटो पोस्ट करत असते. तिच्या या फोटोला नेहमीच तिच्या फॅन्सची पसंती मिळते. 

टॅग्स :मराठी