मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) हिचा आज वाढदिवस आहे. उर्मिलाचे असंख्य चाहते आहेत. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. उर्मिला आणि आदिनाथ (Adinath Kothare) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
उर्मिला कोठारेने सिनेइंडस्ट्रीतील करिअरला नुकतीच सुरुवात केली होती. नायिका म्हणून तिचा एकही चित्रपट आला नव्हता. त्याच दरम्यान महेश कोठारे 'शुभमंगल सावधान' हा चित्रपट करत होते. त्यांना या चित्रपटासाठी एखादी नवीन नायिका हवी होती. या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी महेश यांनी उर्मिलाला त्यांच्या घरी बोलावले होते. उर्मिला त्यांच्या घरी गेली. तेव्हा तिथे आदिनाथ देखील होता. तो नुकताच झोपेतून उठला होता. त्याने उर्मिलाकडे पाहिले आणि तो पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. उर्मिलाच्या करिअर आणि लव्हस्टोरीचा श्री गणेशा कोठारेंच्या घरीच झाला.
उर्मिलाचा 'शुभमंगल सावधान' हा नायिका म्हणून पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात आदिनाथने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. चित्रपटाच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिला यांची सतत भेट व्हायची. त्यातून त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर आदिनाथने उर्मिलाला मुंबईत प्रपोज केले. दोघांनी बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी दोघे लग्नबेडीत अडकले.
लग्नाच्या काही वर्षानंतर उर्मिला आणि आदिनाथ यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव जिजा आहे. ती मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय स्टार किड आहे.
उर्मिला कोठारेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती नुकत्याच स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल झालेल्या मालिका तुझेच मी गीत गात आहेमध्ये काम करताना दिसते आहे. तर आदिनाथचा नुकताच चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.