Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ उमेशचा धमाकेदार बर्थडे बॅश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 16:00 IST

  मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसिदध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधवचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या बर्थडेला उमेशला झक्कास सरप्राईज मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ...

  मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसिदध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधवचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या बर्थडेला उमेशला झक्कास सरप्राईज मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेशच्या बर्थडेला हजेरी लावली. उमेशने अनेक मराठी चित्रपटातील गाणी कारिओग्राफ केली आहेत. चित्रपटसृष्टीत त्याचे अनेक जवळचे मित्र देखील आहेत. या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन उमेशचा वाढदिवस एकदम धमाकेदार अंदाजात साजरा केला. यावेळी संजय जाधव, अंकुश चौधरी, फुलवा खामकर, उर्मिला कोठारे, दिपक राणे, अमितराज, जितेंद्र जोशी, सचिन गुरव, तेजस्विनी पंडित, प्रसाद भेंडे, अशोक शिंदे या कलाकारांनी उमेशचा वाढदिवस साजरा केला. एवढेच नाही तर एकदम यम्मी चॉकलेट केके यावेळी उमेशने कट केला. चॉकलेट केकेवर एक व्हिस्कीच्या बॉटलचे चित्र देखील होते. हा असा आगळावेगळा केक उमेशच्या बर्थडे पार्टीचे आकर्षण ठरला होता.