Join us

मानसीच्या रूपात रुपेरी पडद्यावर झळकणार ‘दोन हजाराची गुलाबी नोट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 16:17 IST

आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा ...

आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली त्यानंतर जुन्या नोटा बंद होत नविन नोटा चलणात आणण्यात आल्या.मात्र जुन्या नोट चलनातून बाद झाल्यामुळे काहींचा हिरमोड झाला तर काहींनी त्या निर्णयाचे स्वागत केले.त्यात 2000 रूपयांच्या नोटने तर सा-यांच्या नजराच आकर्षित केल्या होत्या.गुलाबी रंगाची ही 2000ची नोट प्रत्येकाला हवीहवीशी वाटु लागली. आता अशीच दोन हजाराची नोट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. आता 2000 नोट आणि रूपेरी पडद्यावर ऐकूण थोडं आश्वर्य वाटलेच असणार.पण हे खरे आहे.ही 2000ची नोट रूपेरी पडद्यावर नुसती झळकणारच नाहीय, तर रसिकांना तालावर थिकरकण्यास भागही पाडणार आहे. होय, मराठी सिनेसृष्टीतही दोन हजाराची गुलाबी नोट प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे. ‘प्रेमा’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ या हटके आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच संपन्न झाले. मानसी नाईक हिच्या मोहक अदा सिनेरसिकांना पहायला मिळणार आहेत.मार्कंडेय फिल्म प्रस्तुत,रमेश गुर्रम निर्मित आणि सदानंद इप्पकायल दिग्दर्शित ‘प्रेमा’ या आगामी चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहीली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत.अवधूत गुप्ते,स्वप्नील बांदोडकर आणि रेश्मा सोनावणे यांनी गाणी गायली असून नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै यांनी केले आहे.नयन निरवळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.चलनातील दोन हजाराची गुलाबी नवी नोट लोकांनी जशी स्वीकारली तशीच चंदेरी पडद्यावरची ही दोन हजाराची गुलाबी नोट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.