Join us

दोन मराठमोळे स्टार तामिळ चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 01:36 IST

 बॉलीवुड व मराठी इंडस्ट्री यांच्यातील वाढती मैत्री सध्या जोरदार चर्चेत आहे. पण त्या ही पलीकडे जाऊन दोन मराठमोळे स्टार ...

 बॉलीवुड व मराठी इंडस्ट्री यांच्यातील वाढती मैत्री सध्या जोरदार चर्चेत आहे. पण त्या ही पलीकडे जाऊन दोन मराठमोळे स्टार आता, तामिळ चित्रपटात झळकणार आहेत. कलाकार हा बॉलीवुड असो या मराठी  प्रत्येकाची इच्छा असते की, एकदा तरी दिग्गज कलाकार रजनीकांत यांच्यासोबत एकत्र काम करण्याची.पण हे स्वप्न पूर्ण झाले आहे ते मराठीची स्टार कलाकार राधिका आपटे या सुंदर अभिनेत्रीचे. हे दोन्ही मराठमोळी  कलाकार तामिळच्या 'कबाली' या चित्रपटात एकत्रित पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात राधिका आपटे रजकनीकांत यांच्या वयस्कर पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. चला तर आता, या मराठी इंडस्ट्रीचा ठसा हॉलीवुड, बॉलीवुड व टॉलीवुडमध्ये देखील दिसणार आहे.