Join us

"तुम जियों हजारो साल", तेजस्वीनी पंडीतने खास व्यक्तीला दिल्या खास शुभेच्छा, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:57 IST

Tejaswini wishes this special person. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोत तेजस्विनीसह आणखी एक व्यक्ती दिसत आहे

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचे असेच काही फोटो सध्या तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. 

 तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोत तेजस्विनीसह आणखी एक व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तेजस्विनीचा खास मित्र आहे. मित्राच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीनं खास शुभेच्छा दिल्या आहेत. आदिश अस तिच्या मित्राचं नाव आहे.

आदिशने देखील तेजस्विनीच्या या खास पोस्टला सुंदर असा रिप्लाय दिला आहे. तेजस्विनीच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये तेजस्विनी  आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :तेजस्विनी पंडित