Join us

पाठकबाई झाल्या बोल्ड, पाहा अक्षया देवधरचा हॉट आणि ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 15:52 IST

अशा प्रकारे फोटो शेअर करण्याची अक्षयाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

अभिनेत्री अक्षया देवधर हिची 'तुझ्यात जीव रंगला' ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. अक्षया सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच अक्षयाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

या फोटोत तिचा ग्लॅमरस आणि तितकाच मॉडर्न अंदाज पाहायला मिळत आहे. तिने परिधान केलेला ड्रेसही तितकाच आकर्षक असा आहे. या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे. तसंच या फोटोवर तिचे मित्र-मैत्रिणी आणि फॅन्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

 

अशा प्रकारे फोटो शेअर करण्याची अक्षयाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच व्यस्त शेड्युअलमधून वेळ काढत गोव्याला व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तेथील विविध पोजमधील फोटो तिने शेअर केले होते. पहिल्यांदाच अक्षयाने तिचा असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिला अशा अंदाजात पाहून तिच्या फॅन्सनचे भूवया उंचावल्या होत्या. या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचाही वर्षाव झाला होता.  

टॅग्स :अक्षया देवधरतुझ्यात जीव रंगला