Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हे कबीर नावाचं रिटर्न गिफ्ट...", स्पृहा जोशीने बहिणीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:53 IST

अभिनेत्री स्पृहा जोशी(Spruha Joshi)ने सोशल मीडियावर बहिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशी(Spruha Joshi)ला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती उत्तम अभिनेत्रीसोबत एक कवियित्री, सूत्रसंचालिका आणि युट्यूबर आहे. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. स्पृहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर बहिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

स्पृहा जोशी हिने इंस्टाग्रामवर बहीण शिप्रासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिने लिहिले की, हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग बेबी गर्ल.. यावर्षीचा तुझा वाढदिवस एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्पेशल आहे.. आणि हे कबीर नावाचं रिटर्न गिफ्ट तू आम्हाला यावर्षी आधीच देऊन टाकलंस.. त्यासाठी थँक यू, आय लव्ह यू द मोस्ट.. पण आता त्यात जरा मोठा वाटेकरी आलाय.. खूप प्रेम. अभिनेत्रीच्या या पोस्टवर लाइक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

स्पृहा जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तिच्या पुरुष या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. यात तिच्यासोबत शरद पोंक्षे, अविनाश नारकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. स्पृहा जोशी शेवटची कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रामध्ये स्पृहाचा दांडगा वावर आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.  

टॅग्स :स्पृहा जोशी