Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिशी सक्सेनाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:31 IST

'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव उर्फ रिशी सक्सेनाने मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. शिवच्या भूमिकेतून रिशीचा ...

'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव उर्फ रिशी सक्सेनाने मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. शिवच्या भूमिकेतून रिशीचा चाहता वर्ग वाढला आहे.  राजस्थान विद्यापीठातून रिशीने बी. कॉम. पूर्ण केले आहे. त्या अगोदरपासून १० वर्षे तो क्रिकेट खेळत होता. विविध स्तरांवर रिशी क्रिकेट खेळला आहे.            

रिशी जर अभिनेता नसता तर तो क्रिकेटर झाला असता.

अभिनेते पंकज कपूर आणि मोहन जोशी हे रिशीचे इनस्पिरेशन आहेत आणि सगळ्यांकडून रिशी काही ना काही शिकत असतो.

खाण्यावरती संयम आणि जेवढा वेळ मिळेल त्यात व्यायाम करणं हा रिशीचा फिटनेस फंडा आहे. 

          

गायक ‘नुसरत फतेह अली खान’ यांची सगळी गाणी रिशीच्या गाण्याच्या प्लेलिस्टमध्ये टॉपला असतात.

‘सीके समर’ हा रिशीचा आवडता परफ्युम ब्रॅण्ड आहे.

         अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत काम करायाला रिशीला आवडेल.

रिशीला लाडाने ‘चिंटू’ म्हणतात.              

रिशी हा प्राणीमित्र आहे आणि त्याला मांजर, कुत्रे आवडतात.

स्टायलिश रिशीला वेस्टर्न फॉर्मल्स घालायला आवडतात.