Join us  

Rajeshwari Kharat : “म्हणूनच नागराज सर पुन्हा चान्स देईनात”; ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात होतेय ट्रोल, काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:21 AM

Rajeshwari Kharat : अलीकडेच राजेश्वरीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला. या डान्स व्हिडीओमुळे राजेश्वरीला जबरदस्त ट्रोल केलं जातंय...

नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’ या चित्रपटातील शालूला विसरणं शक्य नाही. या चित्रपटात तिचा एकही डायलॉग नव्हता. पण तरिही शालू भाव खाऊन गेली. शालू व जब्याची जोडी चांगलीच गाजली. काळ्या चिमणीची राख गावली काय लेका हा जब्याचा डायलॉगही तुफान गाजला. चित्रपटात जब्याची भूमिका सोमनाथ अवघडे याने साकारली होती. तर शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने जिवंत केली होती. पण ही शालू आता भलतीच बदलली आहे.  सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत असते. स्वत:चे एक ना अनेक डान्स व्हिडीओ, ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच एका डान्स व्हिडीओची चर्चा आहे. या डान्स व्हिडीओमुळे राजेश्वरीला जबरदस्त ट्रोल केलं जातंय.

या व्हिडीओत राजेश्वरी ‘डर्टी लिटल सिक्रेट’ या गाण्यावर डान्स करता दिसत आहेत. यात तिचे दोन लूक पाहायला मिळत आहेत. पहिल्या लूकमध्ये तिने जीन्स व क्रॉप टॉप घातलं आहे, तर दुसऱ्यामध्ये तिने डीप नेक वन पीस घातला आहे. काही चाहत्यांना तिचा हा बोल्ड डान्स व्हिडीओ आवडला. पण काहींनी मात्र हा व्हिडीओ पाहून नाक मुरडलं. ‘हे असे चाळे चालणार नाही शालू समजलं का नाही...’, असं म्हणत अनेकांनी राजेश्वरीला ट्रोल केलं.

‘म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात’, असं म्हणत एका युजरने राजेश्वरीला सुनावलं. ‘शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं’,अशी कमेंट अन्य एका युजरने केली. ‘कसले चाळे करती... हिरोईन आहेस, ॲक्टिंगवर ध्यान दे,’, अशा प्रकारच्या कमेंट्स त्यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

शालू साकारणारी राजेश्वरी खरात हिला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिलं होतं. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात. नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमेऱ्यापुढे उभी झाली. 

टॅग्स :राजेश्वरी खरातनागराज मंजुळेमराठी अभिनेतामराठी चित्रपट