Join us  

ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडेची 'बेभान' जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 11:22 AM

 मराठी चित्रपटसृष्ट्रीतील कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटांकडे पाऊल टाकत असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्ट्रीकडे येणाºया कलाकारांचे ...

 मराठी चित्रपटसृष्ट्रीतील कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटांकडे पाऊल टाकत असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्ट्रीकडे येणाºया कलाकारांचे प्रमाण कमीच असते. मात्र आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा तगडा कलाकार ठाकुर अनूपसिंग हा प्रेक्षकांना लवकरच मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. बेभान असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ठाकूर अनूपसिंगसोबत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकणार आहे. तसेच या चित्रपटात  स्मिता जयकर व संजय खापरे यांचा ही अभिनय प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनूप अशोक जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. शांभवी फिल्मस या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडे यांची हटके जोडी पाहता येणार आहे.  ए.वि प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटासाठी सुमधूर संगीत दिले असून मंगेश कांगणे यांनी गीते लिहिली आहेत. अनूप-अनूप अशा जोडगोळीचा रोमान्स विथ अ‍ॅक्शन या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच सिंघम -3 या तेलगू तर कमांडो २ या हिंदी अशा आगामी चित्रपटांमध्ये ठाकुर अनूपसिंग झळकणार आहे. तर मृण्मयी देशपांडे यापूर्वी नटसम्राट, अनुराग, कटयार काळजात घुसली अशा अनेक चित्रपटात पाहायला मिळाली.  दिग्दर्शक अनूप अशोक जगदाळे यांच्या 'बोभाटा' या सिनेमाची चर्चा सिनेवतुर्ळात जोरदार चालू आहे. मधूकर (अण्णा) उद्धव देशपांडे हे निमार्ते असून सह निमार्ते प्रसाद देशपांडे आहेत. दिनेश देशपांडे यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना २०१७ मध्ये पाहायला मिळणार आहे.