Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनीचा हॉट आणि घायाळ करणारा अंदाज, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 08:00 IST

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

'मी सिंधुताई सपकाळ', 'तू ही रे' असे सिनेमा, विविध नाटकं आणि '१०० डेज' सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. गोल्डन टॉपमध्ये तिचा हॉट अंदाज आणि घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. या फोटोला तिने एक कॅप्शनही दिली आहे. “प्रत्येक दिवस धावपळीचा असतो, त्यामुळे थकते का? हो, मी कधी हार मानते का?, नाही” असा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देणारी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. रसिकांकडून आणि तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  

टॅग्स :तेजस्विनी पंडित