Join us
Daily Top 2Weekly Top 5

RaanBaazaar Promo :नेमकी शिकार कोणाची होणार? पाहा, ‘रानबाजार’च्या नव्या एपिसोडचा नवा थ्रीलिंग प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:30 IST

RaanBaazaar New Promo : गेल्या 20 मे रोजी ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झालेत आणि या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता उद्या शुक्रवारी या सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होत आहेत. तूर्तास त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

मराठी वेबविश्वाला हादरवून सोडणारी ‘रानबाजार’ (RaanBaazaar ) ही मराठी वेबसीरिज रिलीज झाली आणि या सीरिजवर लोकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) या सर्वार्थाने ‘बोल्ड’ असलेल्या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गेल्या 20 मे रोजी या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झालेत आणि या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता उद्या शुक्रवारी (27 मे) या सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होत आहेत. तूर्तास त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

तिसऱ्या भागानंतर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. चौथ्या भागात नक्की काय घडणार, ही कथा नक्की कुठे येऊन थांबणार, याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय. प्रोमोत उर्मिला कोठारेची झलकही दिसतेय. म्हणजेच येणाऱ्या एपिसोडमध्ये तिचा अभिनयही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जेव्हा एका वादळाची सुरूवात होते,  त्याला हे माहित नसतं की त्याच्या तडाख्यात  कुणाचे आणि किती बळी जाणार... पण बळी जाणार हे निश्चित असतं, अशा डायलॉगने प्रोमोची सुरूवात होते. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी दोघींनीही हा प्रोमो शेअर केला आहे. सोबत पहिल्या तीन एपिसोड्सला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.

या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणा?्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठीने केली असून अभिजीत पानसे यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!

'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अ‍ॅप इन्स्टॉल करा आत्ताच!

अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx

आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS

टॅग्स :रानबाजार वेबसीरिजतेजस्विनी पंडितप्राजक्ता माळीवेबसीरिज