Join us

तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिलाय लीप लॉक, कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 07:00 IST

पहिल्याच चित्रपटात तेजश्रीने किसिंग सीन दिल्याने याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटामुळे तिचा बबलू बॅचलर हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाहीये. 

तेजश्री प्रधानने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध सिनेमातील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सून बनली. या मालिकेआधी तिने झेंडा या चित्रपटात काम केले होते. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली. 

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. अग्गंबाई सासूबाई या नुकत्याच संपलेल्या तिच्या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.

तेजश्री बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे तिचा बबलू बॅचलर हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाहीये. 

बबलू बॅचलर या चित्रपटात शर्मन जोशी आणि तेजश्री यांची जोडी जमली असून त्यांनी याआधी एका नाटकात काम केले होते. या नाटकाला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बबलू बॅचलर' या चित्रपटाचा ट्रेलर गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या ट्रेलरमध्ये चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळाला होता. पहिल्याच चित्रपटात तेजश्रीने किसिंग सीन दिल्याने याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

टॅग्स :तेजश्री प्रधान