स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट हिरो' म्हणून त्याला ओळखलं जात. स्वप्नीलचा सोशल मीडियावरही भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. स्वप्नील जोशी विविध कारणांनी चर्चेत असतो. अशातच स्वप्नील जोशीनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची मुलं मायरा आणि राघव हे त्याला त्यांची स्वच्छ आणि व्यवस्थित आवरलेली खोली दाखवत आहेत.
व्हिडीओमध्ये दिसतं की स्वप्नीलचा मुलगा राघव म्हणतो, "बाबा तू खूप दिवसांनी आला आहेस? तर आम्ही तुझ्यासाठी आमच्या खोलीत एक सरप्राईज तयार केलं आहे". पुढे मायरा म्हणते की, "तू म्हणतोस तुला गोष्टी जागच्या असलेल्या, स्वच्छ असलेल्या, आवरलेल्या आवडतात". तर त्यावर स्वप्नील 'हो' म्हणतो आणि मुलांबरोबर त्यांच्या खोलीत जातो. मुलांच्या खोलीतील दृश्य पाहून तो भारावून जातो. सुंदर लाइट्स, व्यवस्थित लावलेला बेड, पुस्तकांचे कपाट आणि अभ्यासाचा टेबल पाहून तो मुलांचे कौतुक करतो. विशेष म्हणजे, अभ्यासाच्या टेबलावर स्वामी समर्थांचा फोटोही अतिशय श्रद्धेने ठेवलेला दिसला.
हा व्हिडीओ शेअर करताना स्वप्नीलने लिहिले, "जिथे स्वच्छता असते तिथे देव असतो. यरा व राघवने घरात माझं उत्तम पद्धतीनं स्वागत केलं. दिवसाचा शेवट करण्यासाठी आवरलेली खोली ही उत्तम गोष्ट आहे". स्वप्नील जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं सध्या तो लग्नपंचमी या नाटकामुळे चर्चेत आहे. अमृता खानविलकर या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाचे निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शन केले आहे. तर मधुगंधा कुलकर्णीने ते लिहिले आहे.
Web Summary : Actor Swapnil Joshi shared a video showcasing his children, Myra and Raghav, presenting their clean and organized room. He praised their efforts, noting the tidy space and the presence of a Swami Samartha photo on the study table. Joshi is currently involved in the play 'Lagna Panchami'.
Web Summary : अभिनेता स्वप्निल जोशी ने अपने बच्चों, मायरा और राघव का एक वीडियो साझा किया, जिसमें वे अपना साफ और व्यवस्थित कमरा दिखा रहे हैं। उन्होंने उनकी प्रयासों की सराहना की, साफ जगह और स्टडी टेबल पर स्वामी समर्थ की तस्वीर की उपस्थिति पर ध्यान दिया। जोशी वर्तमान में नाटक 'लगना पंचमी' में शामिल हैं।