Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारीच...! स्वप्नील जोशीनं खरेदी केली नवी कोरी Jaguar, पाहा फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 11:08 IST

Swapnil Joshi : लुक्स ऑसम, खूप खूप शुभेच्छा भाऊ, अशा शब्दांत रितेश देशमुखने स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. अभिनेता सुबोध भावे याने ‘भारी आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी  (Swapnil Joshi) सध्या जाम चर्चेत आहे. लवकरच स्वप्नील जोशी स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येतोय.  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी असणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली आणि प्रादेशिक भाषांमधील सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका या ओटीटीवर पाहायला मिळतील. याशिवाय लवकरच ‘बळी’ नावाचा त्याचा सिनेमाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इतकंच नाही तर आता गड्यानं नवी कोरी जॅग्वार कार सुद्धा खरेदी केली आहे.

होय, स्वप्नीलनं नुकतीच ‘जॅग्वार आय पेस’ ही लक्झरी कार खरेदी केली.आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कारचे काही फोटो शेअर त्याने केले आहेत. यामध्ये तो आपल्या फॅमिलीसोबत कारच्या शोरूममध्ये दिसून येत आहे.

स्वप्नील जोशीने नव्याको-या कारचे फोटो शेअर करताच, शुभेच्छांचा वर्षाव तर होणारच. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीनींही स्वप्नीलला भरभरून शुभेच्छा दिल्यात.  

अमृता खानविलकर, पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे, श्रेया बुगडे, सुबोध भावे, सुयश टिळक,भरत जाधव पासून ते बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखपर्यंत सर्वांनी स्वप्नीलला शुभेच्छा दिल्यात.  लुक्स ऑसम, खूप खूप शुभेच्छा भाऊ, अशा शब्दांत रितेश देशमुखने स्वप्नीलचं अभिनंदन केलं.  अभिनेता सुबोध भावे याने ‘भारी आहे’ अशी प्रतिक्रिया दिली तर अभिनेता सुयश टिळकने इमोजी पोस्ट करुन ‘कारमुळे तुझा हेवा वाटतो, आता मी तुझ्यावर जळू लागलोय,’ अशी प्रतिक्रिया दिली. अभिनेता भरत जाधवने ‘वा... मस्त..., खुप खुप शुभेच्छा...’ अशा शब्दात स्वप्नीलचं अभिनंदन केलं. तर अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘अभिनंदन, व्हॉट अ ब्युटी’ अशी कमेंट केली.

स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कालपरवाच त्यानं ‘बळी’ या त्याच्या नवा चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. येत्या 9डिसेंबरला हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हॉरर चित्रपटात स्वप्नीलसोबत पूजा सावंत आणि अभिनेता समर्थ जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :स्वप्निल जोशी