Join us

 सुयश टिळकचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 10:38 IST

खलील जिब्रान यांचे एक कोट शेअर करत, सुयशने सोशल मीडियाचा निरोप घेतला

ठळक मुद्देसुयशबद्दल सांगायचे तर सुयशने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडच्या ‘खालीपीली’ या सिनेमात झळकला होता.  

‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता सुयश टिळक आत्तापर्यंत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होता. पण आता मात्र सुयशने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. होय, सुयशने एक पोस्ट शेअर करत, याची माहिती दिली आहे.खलील जिब्रान यांचे एक कोट शेअर करत, सुयशने सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे. इतकेच नाही तर त्याने एक इन्स्टा स्टोरीही शेअर केली आहे. ‘Offline is the new luxury,’ असे त्याने आपल्या इन्स्टास्टोरीत म्हटले आहे.

सुयशने अचानक सोशल मीडियाला रामराम ठोकलेला पाहून चाहते हैराण आहेत. तसे सोशल मीडियाला रामराम ठोकणारा वा सोशल मीडियावरून काही काळ ब्रेक घेणारा सुयश एकटा नाही. याआधीही अनेक सेलिब्रिटींनी असे केले आहे.  

सोशल मीडियावर सेलिब्रिटी वेगवेगळ्या मुद्यांवर स्वत:ची मते मांडताना तसेच स्वत:चे व्हिडीओ व फोटो शेअर करताना दिसतात. मात्र बहुतांश वेळा फोटो, व्हिडीओ वा व्यक्तिगत मतांमुळे सेलिब्रिटींना  ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागते. या सततच्या ट्रोलिंगला कंटाळून हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.  काही काळासाठी सोशल मीडियापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेणाºया कलाकारांची संख्याही वाढते आहे. 

सुयशबद्दल सांगायचे तर सुयशने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडच्या ‘खालीपीली’ या सिनेमात झळकला होता.  सुयशने  चौथीपासून अभिनय करण्यास सुरुवात केली. त्याने चौथीमध्ये असताना एक नाटक रंगभूमीवर सादर केले. त्या दिवसांपासून ते आजपर्यंत त्याचे नाटकांविषयी असणारे प्रेम कायम असल्याचे पाहायला मिळते. ‘अमरप्रेम’ या मालिकेतून त्याला पहिला ब्रेक मिळाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने बंध रेशमाचे, भैरोबा, नाट्यरंग, पुढचं पाऊल, दुर्वा, का रे दुरावा अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :सुयश टिळक