Join us

सुनील गोडबोले झळकणार वेब सिरीजमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:10 IST

मराठी माणूसही जिद्दीला पेटून स्टार्ट-अप सुरु करू शकतो या विषयावर प्रकाश टाकणारी वेब सिरीज असून त्यासाठी जोड हवी योग्य मित्रांची, जोडीदाराची आणि मुख्य म्हणजे अपार कष्टाची आणि हेच तंतोतंत ओळखून ही सिरीज रसिकांच्या भेटीला आली आहे.

काम करा, काम करा म्हणत सगळ्यांना शिस्तीचे पालन करायला लावणारे ‘का रे दुरावा’मधील  सुनील गोडबोले नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहतात. मालिका,नाटकं यांमधून त्यांनी नेहमीच बरीच कामं केली. आणि आता पहिल्यांदाच त्यांनी  वेब सिरीज ‘फाऊंडर्स’मध्ये  झळकणार आहेत. वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच काम करत असले तरी त्यांचा अभिनय नेहमीप्रमाणे उत्तम झाला आहे. त्यामुळे त्यांना आता डिजिटल माध्यमातील या नव्या वेब सिरीजमधून बघायला सगळ्यांना नक्कीच आवडेल.

वय वर्ष ६५ असलेले अभिनेते सुनील गोडबोले यांच्या कामातील उत्साह आजच्या तरुण अभिनेत्याला लाजवेल असा आहे. गोडबोले या वेब सिरीजबद्दल बोलताना म्हणाले की, “ज्या प्रकारे अभिनेत्याला वयाची अट नसते तशीच स्टार्ट-अप सुरु करायला वयाची अट नसते. गरज असते ती उत्साहाची आणि मेहनतीची. या सिरीजमध्ये मी एका बड्या कंपनीच्या फाऊंडरच्या भूमिकेत आहे. जो यातल्या ४ मुलांना स्वतःचा स्टार्ट अप सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करतो. मालिका आणि सिनेमा या पेक्षा डिजिटल हे माध्यम खूप निराळं आहे. दिग्दर्शक संदीप मनोहर नवरे यांच्या सहज सोप्या दिग्दर्शन शैलीमुळे मला काम करणं सोपं गेलं. उलट मी म्हणेन की, मला अधिक आनंद मिळाला. ही वेब सिरीज अशा सर्व मराठी तरुणांना मार्गदर्शन करणारी ठरणार आहे. जे आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छितात.

मुळात तरुणाईसाठी नेहमी त्यांचे प्रश्न, त्यांचे आयुष्य, त्यांची स्वप्न दाखवणारा कंण्टेंट लोकांसमोर आणणं अशी आहे... आणि आता त्यांची "#फाऊंडर्स" वेब सिरीज... अनपेक्षित गोष्ट, जी तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर नेहमी घडत असते, ते म्हणजे स्टार्ट-अप पण आपण त्याकडे इतके लक्ष देतोच असे नाही... पण मराठी माणूसही जिद्दीला पेटून स्टार्ट-अप सुरु करू शकतो या विषयावर प्रकाश टाकणारी वेब सिरीज असून त्यासाठी जोड हवी योग्य मित्रांची, जोडीदाराची आणि मुख्य म्हणजे अपार कष्टाची आणि हेच तंतोतंत ओळखून ही सिरीज रसिकांच्या भेटीला आली आहे.

ही गोष्ट आहे चार मित्रांची. यश, ह्रिषीकेश, राजू आणि स्वरा यांची. एकच नोकरी करून ते वैतागले आहेत... आणि आता त्यांना काहीतरी अजून नवीन शिकायची आणि स्वतः काहीतरी करायची इच्छा आहे... या वेब सिरीजच्या सुरुवातीलाच डायलॉग आहे की, “मराठी माणूस हा नेहमी नोकरदार म्हणून बघितला जातो...” मग असं खरंच असेल तर असं का ?? या सगळ्याचे उत्तर म्हणजे "फाऊंडर्स" ही वेब सिरीज आहे... आतापर्यंतच्या  एपिसोडमध्ये त्या मित्रांनी बऱ्याच अडचणींना तोंड दिलेलं दिसत आहे... पण त्यांनी हार मानलेली नाही... आता पुढे त्या मित्रांच्या प्रयत्नांना कशी दिशा मिळणार आणि प्रॉब्लेम्सला कसे सामोरे जाणार... हे बघायला नक्कीच आवडेल...