मराठी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता पुष्कर श्रोत्रीला पितृशोक झाला आहे. त्याचे वडील सुधाकर श्रोत्री यांचं काल निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकर श्रोत्री हे वृत्तपत्र वितरणातील मोठं नाव होतं. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेमध्ये त्यांचं बरंच योगदान होतं. त्यांनीच या व्यवस्थेला योग्य दिशा दिली. आज ते आपल्यात नाहीत हे समजताच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलं, सुना आणि नातवंडं परिवार आहे.
सुधाकर श्रोत्री यांचा वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत एकूण ६५ वर्षांचा कार्यकाळ होता. कामातील त्यांची निष्ठा वाखणण्याजोगी होती. तसंच त्यांना साहित्यातही रस होता. त्यांनी असंख्य कविताही केल्या आहेत. शिवाय वडिलोपार्डित, लेडीज स्पेशल आणि खास सचिन तेंडुलकरवरील त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. आज सकाळी ८ वाजता विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधाकर श्रोत्री हे 'पार्लेकर त्रैमासिकाचे संपादक म्हणून शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांचा मुलगा पुष्कर श्रोत्री मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. वडिलांप्रमाणेच त्यालाही साहित्याची जाण आणि रस आहे. सुधाकर श्रोत्रींच्या निधनाने त्याच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं आहे. मराठी इंडस्ट्री आणि सामाजिक-साहित्य क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Web Summary : Veteran newspaper distributor Sudhakar Shrotri, father of actor Pushkar Shrotri, passed away at 89. He significantly contributed to the newspaper distribution system. Shrotri was also a poet with published collections. His funeral was held in Vile Parle.
Web Summary : अभिनेता पुष्कर श्रोत्री के पिता और अनुभवी समाचार पत्र वितरक सुधाकर श्रोत्री का 89 वर्ष की आयु में निधन हो गया। उन्होंने समाचार पत्र वितरण प्रणाली में महत्वपूर्ण योगदान दिया। श्रोत्री एक कवि भी थे जिनकी कविता संग्रह प्रकाशित हुई। विले पार्ले में उनका अंतिम संस्कार किया गया।