रेतीमध्ये कलाकारांची तगडी फौज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 09:22 IST
कोणताही सिनेमा हा फक्त त्यातील कलाकार कोण आहे या नावावरच चालतो. आपल्याकडे देखील आता मल्टीस्टार ...
रेतीमध्ये कलाकारांची तगडी फौज
कोणताही सिनेमा हा फक्त त्यातील कलाकार कोण आहे या नावावरच चालतो. आपल्याकडे देखील आता मल्टीस्टार सिनेमांचा ट्रेंड येत आहे. परंतू कलाकारांच्या मांदियाळीत सिनेमा कधी कधी हरवून बसतो अशी भीती नक्कीच असते. पण एकाच सिनेमात जर कसलेले अभिनेते प्रेक्षकांना पहायला मिळाले तर तो सिनेमा सुपरहिट झाल्याशिवाय राहत नाही. अशाच रेती या सिनेमामध्ये बरेच तगडे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत. किशोर कदम, शशांक शेंडे, विद्याधर जोशी, संजय खापरे, चिन्मय मांडलेकर, गायत्री सोहम या कलाकारंनी रेती मध्ये महत्वपुर्ण भुमिका साकारल्या आहेत. आता एवढ्या बड्या कलाकारांची वर्णी रेती मध्ये आहे म्हटल्यावर कोणाची भुमिका जास्त महत्वपुर्ण आहे असे वाटत असेल तर या चित्रपटातील सर्वच कलाकार सांगतात. आमच्या भुमिका या त्या-त्या रोल साठी रिक्वायर्ड आहेत उगाचच कोणाचाही रोल खेचलेला नाही. आता या चित्रपटामध्ये या सर्वांच्याच भुमिका किती रंग चढवतायेत हे पाहणे रंजक ठरेल