Join us
Daily Top 2Weekly Top 5

परश्या एन्जॉय करतोय मॉरिशियसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 13:13 IST

सैराट या चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर सध्या मॉरिशियसमध्ये एॅन्जॉय करत आहे. सैराट या चित्रपटानंतर परश्याच्या ...

सैराट या चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर सध्या मॉरिशियसमध्ये एॅन्जॉय करत आहे. सैराट या चित्रपटानंतर परश्याच्या करिअरल्या चार चाँद लागलेले दिसत आहे.  कारण या चित्रपटानंतर त्याला लगेच महेश मांजरेकर यांचा चित्रपट मिळाला आहे. आता तर थेट तो, मॉरिशियसमध्ये बिकिनी गर्ल्ससोबत एन्जॉय करताना दिसत आहे. सैराट या चित्रपटाच्या प्रसिध्दीनंतर ही लाजराबुजरा असणारा हा परश्या आता मात्र इंडस्ट्रीमध्ये सैराट झालेला दिसत आहे. परश्याचा हा बिनधास्तपणा त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरणार हे मात्र नक्की.