Join us

स्पृहाचा ग्लॅमर लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 19:04 IST

आपल्या अभिनयाने व कवितांनी प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. ...

आपल्या अभिनयाने व कवितांनी प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमधील तिचा लूक खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा हटके लूक पाहून तिचे चाहतेदेखील अवाक झाले आहे. पण तिच्या या बोल्ड लूकला चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिले आहेत. तर काहींनी दिल छू लिया म्हणत तिच्या या सौदर्यांचे कौतुक केले आहे. तर स्पृहानेदेखील हा फोटो बॉलीवुड स्टाइलने काढला असल्याने फोटोखाली अपडेट केले आहे. त्याचबरोबर तिने या फोटोशूटचे श्रेयदेखील विनायक कुलकर्णी यांला दिले आहे. पण तिचे हे फोटो कोणत्या चित्रपटासाठी काढण्यात आले आहे का हे मात्र कळाले नाही.