Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त 'रणपति शिवराय' सिनेमाची खास ऑफर! जितक्या जास्त संख्येने थिएटरमध्ये जाल, तितकी तिकीट स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:34 IST

टीमने 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची प्रेक्षकांना खास ऑफर दिली आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाचा थिएटरमध्ये नक्कीच आनंद घेता येईल. जाणून घ्या काय आहे ऑफर?

'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक सिनेमातील सहावं पुष्प म्हणून हा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. हा सिनेमा बघण्यासाठी शिवप्रेमी थिएटरमध्ये चांगलीच गर्दी करत आहेत. अशातच सिनेमाच्या टीमने 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची प्रेक्षकांना खास ऑफर दिली आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाचा थिएटरमध्ये नक्कीच आनंद घेता येईल. जाणून घ्या काय आहे ऑफर.

ऑफरमध्ये काय आहे खास?'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट लिहून या ऑफरबद्दल सांगितलं आहे. ''आगामी शिवजयंतीच्या निमित्ताने खास… पोहोचवूया 'राजे' आणि त्यांचं 'स्वराज्य' प्रत्येक मनामनांत.. आणि घराघरांत…!!! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमा पहायला तुम्ही जितक्या जास्त संख्येने याल तितक्या जास्त संख्येने तिकीट दरात सवलत मिळेल!!!'', असं कॅप्शन लिहून या ऑफरबद्दल सर्वांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 'रणपति शिवराय' पाहायला प्रेक्षक गर्दी करतील यात शंका नाही.

'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाविषयी

'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना या कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. ६ फेब्रुवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिजीत श्वेतचंद्रने साकारलेली शिवरायांची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Ranapati Shivray' Movie Offer: Discounted Tickets for Larger Groups!

Web Summary : On Shivjayanti, 'Ranapati Shivray Swari Agra' offers discounted tickets for larger groups. The film, part of Digpal Lanjekar's series, is drawing crowds, and this special offer encourages more viewers to experience it in theaters.
टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजदिग्पाल लांजेकरशिवजयंती