Join us

सोनाली मागतीये आदित्यला पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 08:49 IST

             कोणाचाही बर्थ डे असो फ्रेन्ड्स साठी तर पार्टी बनती है बॉस अशी डायलॉगबाजी ...

             कोणाचाही बर्थ डे असो फ्रेन्ड्स साठी तर पार्टी बनती है बॉस अशी डायलॉगबाजी आपल्याला कॉलेज कट्ट्यांवर, आॅफिस अन सगळीकडेच पहायला मिळते. मित्र बर्थडेच्या शुभेच्छा नंतर देतील आधी पार्टी मागतील अशी सिच्युएशन तर आजकाल प्रत्येक फ्रेन्डसर्कलमध्येच असते. एवढेच काय आता पहा ना आपल्या फिल्मी दुनियेतील सितारे देखील अशा बर्थ डे पार्टीज मागण्यात काही कमी नाहीत. आपण कलाकारांच्या वाढदिवसाच्या मोठ मोठ्ल्या ग्रॅन्ड पार्टीज तर आपण पाहतोच. आता अशीच एक पार्टी आपली पोश्टर गर्ल सोनाली कुलकर्णी तिचा मित्र दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याला मागत आहे. ही पार्टी आहे आदित्यच्या बर्थ डे ची. आता बर्थ डे पार्टी कोण सोडणार म्हणा, म्हणुनच आपली ही अप्सरा आदित्याला पार्टी कधी देणार असे विचारत आहे. एवढेच नाही तर ती आदित्यला म्हणतीये खुप साºया पार्टीज पेंडींग आहेत. आता आपण तर एवढेच म्हणुणात कि सोनालीला तिची ही पार्टी लवकरच मिळू देत.