Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णी म्हणते “ये ‘टब’ की ‘बाथ’ है”,सोशल मीडियावर रंगल्या खुमासदार चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 12:02 IST

बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील सोनालीच्या अदा कुणालाही घायाळ करतील.

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्या शिवाय राहणार नाही. या फोटोत सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील सोनालीच्या अदा कुणालाही घायाळ करतील.

 

या फोटोसह तिने एक कॅप्शनसुद्धा जोडली आहे. “ये ‘टब’ की ‘बाथ’ है” अशी लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. यातून आपली विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) चांगली आहे असंही सोनालीने टॅगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सोनालीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु आहे. लवकरच सोनाली 'ती आणि ती' या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सोनालीसह या सिनेमात बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरेसुद्धा झळकणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच सोनाली मस्त परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली.पोर्तुगाल या शहरात सोनाली व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. या शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांना सोनाली भेट  दिली. पोर्तुगालमधील प्रत्येक क्षण सोनाली कॅमेऱ्यात कैद केला. हेरिटेज दर्जा प्राप्त व्हिटोरिया शहरातील क्लेरिगोस टॉवरसमोर ती फोटोसेशन करते तर कधी पोर्टोमधील ट्रॅममध्ये प्रवासाचा आनंद लुटताना ती दिसली. इतकंच नाही सुंदर अशा पोर्टो शहरात स्वतःला फिट ठेवण्याचाही तिने प्रयत्न केला.या इथल्या प्रसिद्ध फुटबॉल स्टेडिअमचीही तिने सैर केली. हे सगळे फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या प्रत्येक फोटोवर फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव होत आहे.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णी