Join us

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली..! सोनाली कुलकर्णीने शेअर केलं हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 15:27 IST

अलीकडेच सोनालीने मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला होता.

आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. सोनालीने नुकतेच तिचे ग्लॅमरस आणि हॉट असे फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. सोनालीचे हे फोटोशूट पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. सोनाली  यात खूपच सुंदर दिसते आहे. चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. 

अलीकडेच सोनालीने  मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला होता. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केले होते.

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

लवकरच ती थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णी