Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले बाथटब फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 18:47 IST

“ये ‘टब’ की ‘बाथ’ है” अशी लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. यातून आपली विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) चांगली आहे असंही सोनालीने टॅगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. या फोटोत सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात. अगदी त्याचप्रमाणे तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. 

बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील सोनालीच्या अदा कुणालाही घायाळ करतील. या फोटोसह तिने एक कॅप्शनसुद्धा जोडली आहे. “ये ‘टब’ की ‘बाथ’ है” अशी लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. यातून आपली विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) चांगली आहे असंही सोनालीने टॅगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सोनालीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु आहे. 

गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली. दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी 2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला असल्याचे खुद्द तिनेच सांगितले होते.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी