Join us
Daily Top 2Weekly Top 5

लघुपटातून मिळणार सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 12:44 IST

वारी ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. सुमारे सातशे वर्षांपासून वारी अखंडितपणे सुरू आहे. सर्वांत दीर्घ पायी यात्रा म्हणूनही वारीची विशेष ख्याती आहे.आषाढी आणि कार्तिकी एकादशीनंतर पंढरपुरात स्वच्छतेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

वारी ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. सुमारे सातशे वर्षांपासून वारी अखंडितपणे सुरू आहे. सर्वांत दीर्घ पायी यात्रा म्हणूनही वारीची विशेष ख्याती आहे.आषाढी आणि कार्तिकी एकादशीनंतर पंढरपुरात  स्वच्छतेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर,वारी मार्गावरील अस्वच्छतेवर पालखी आणि नंतर या लघुपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटाचे निमार्ते  नीलेश नवलाखा यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन  केलं असून नवलाखा आर्ट्स आणि होली बेसिल कंबाईन यांनी सामाजिक भावनेतून या लघुपटाचे निर्मिती केली आहे. वारी मार्गावरील स्वच्छतेच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी माजी खासदार प्रदीप रावत यांच्या सेवा सहयोग फाऊंडेशनने एक उपक्रम राबवला होता. मागील वर्षी वारी मार्गावरील दोन गावे दत्तक घेऊन त्या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे बसवण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक स्वच्छतेचा संदेश वारकरी आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा लघुपट करण्यात आला आहे.