जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठीशी उभा होता. त्यानंतर पुण्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत मराठी अभिनेत्री स्नेहल तरडेदेखील सहभागी झाली होती. याचा व्हिडिओ स्नेहल तरडेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री स्नेहल तरडे या तिरंगा यात्रेत तिच्या मैत्रिणींसह सहभागी झाली होती. याचा व्हिडिओ शेअर करत ती म्हणते, "भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख, भिकारड्या पाकड्याचा राग आणि दहशतवादी ठेचल्याचा आनंद अशा संमिश्र भावना सोबत बाळगून या यात्रेत मैत्रिणीसह सहभागी झाले. भारत माता की जय! भारतीय सैन्यदलाचा विजय असो!". अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते तिचं कौतुक करत आहेत.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला.