Join us

गायिका बनली अभिनेत्री,सावनी रविंद्रची नवी इनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:28 IST

सध्याचा जमाना सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनचा आहे. या माध्यमातून अनेक जण आपल्या आवडत्या कला जोपासतात. आपल्या कलेचं दर्शन जगाला घडवून देण्यासाठी आजच्या युगातली ही माध्यमं बरीच हिट ठरत आहेत.त्यामुळे वेबसिरीजच्या माध्यमातून सावनी रविंद्र अभिनेत्री बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही वर्षात आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्रने रसिकांचे  मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. सावनीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये देखील खूप गाणी गायली आहेत. आता सावनी  नवी इनिंग सुरु करत आहे.तिने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'गालिमार' ह्या वेबसीरिजमध्ये तिच्या अभिनय कौशल्याची वेगळी चुणूक पाहायला मिळणार आहे.

आपल्या ह्या पदार्पणाविषयी ती म्हणाली, “ह्या वेबसीरिजची निर्माती आदिती द्रविड माझी जूनी मेत्रिण आहे. तिने जेव्हा वेबसीरिजसाठी विचारले तेव्हा पहिल्यांदा मला गाण्यासाठी विचारले असल्याचे वाटले. पण नंतर तिने अभिनयासाठी विचारणा केल्याचा उलगडा झाला. खरं तर मला अशा ऑफर ब-याचदा आल्या होत्या. पण मला अभिनय क्षेत्रापेक्षा गायनातच करीयर करायचे असल्याने नेहमीच अशा ऑफर्सना नाकारत गेले. पण आदितीशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीमूळे तिला नाही म्हणता आले नाही.”सावनीने ह्या वेबसीरिजमध्ये सुयश टिळकसोबत अभिनय केला आहे. त्याविषयी ती सांगते, “सुयश माझा क़ॉलेजमधला मित्र. त्यामूळे त्याच्यासोबत काम केल्यामुळे खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणूनच अभिनय करण्याचा पहिला-वहिला अनूभव जास्त एन्जॉय करू शकले.” 

सध्याचा जमाना सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनचा आहे. या माध्यमातून अनेक जण आपल्या आवडत्या कला जोपासतात. आपल्या कलेचं दर्शन जगाला घडवून देण्यासाठी आजच्या युगातली ही माध्यमं बरीच हिट ठरत आहेत.त्यामुळे वेबसिरीजच्या माध्यमातून सावनी रविंद्र अभिनेत्री बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे.

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगींगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. त्यामूळेच आता सावनी आपलं ‘टिक-टिक वाजते – पियु बोले’ हे मॅशअप घेऊन आलीय. संगीतकार गौरव डगावकरसोबत सावनीने हे मॅशअप गायलंय.सावनी आपल्या नव्या मॅशअपविषी सांगते, “गौरव भेटला की आमची नेहमीच जॅमिंग सेशन रंगतात. अशाच एका जॅमिंगसेशन दरम्यान हे गाणं आकाराला आलं. गौरव टिकटिक वाजते गात होता. आणि मी पियु बोले गाऊ लागले. आणि मॅशअप रंगलं. मग आम्ही हे मॅशअप रेकॉर्ड करायचे ठरवले. गौरव आणि माझं हे पहिलं मॅशअप आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, कानसेनांना हे मॅशअप खूप आवडेल.”