Join us
Daily Top 2Weekly Top 5

गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याचा मूहुर्त ठराला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 19:24 IST

'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड हे नाव घराघरात पोहोचले.

 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड हे नाव घराघरात पोहोचले. 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स'स्पर्धची गायिका कार्तिकी विजेती ठरली होती. कार्तिक आता एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. झी 24 तासच्या रिपोर्टनुसार कार्तिक गायकवाडचे लग्न ठरले आहे. नुकताच तिचा बघण्याचा कार्यक्रम पार पडला. येत्या 26 जुलैला कार्तिकीचा साखरपुडा होणार आहे. आपल्या गायिकेच्या जोरावर कार्तिकीने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून तिचा साखरपुडा घरातच पार पाडणार आहे. कार्तिकीच्या होणाऱ्या पतीचे नाव रोनित पिसे आहे.  रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे.  रोनित पिसे पुण्याचा राहणारा आहे. रोनितचे कुटुंब हे कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील आहे. रोनित पिसे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. कार्तिकच्या लग्नाची तारीख अद्याप कळू शकली नाही. कार्तिकीचे चाहते ही बातम ऐकून नक्कीच खुश होतील यात काही शंका नाही. 

टॅग्स :झी मराठी