Join us
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती सिद्धार्थची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:44 IST

 सध्या मराठी रुपेरी पडद्यावर नव्या फ्रेश जोड्यांचा बोलबाला आहे. अशीच एक जोडी आगामी भय या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला ...

 सध्या मराठी रुपेरी पडद्यावर नव्या फ्रेश जोड्यांचा बोलबाला आहे. अशीच एक जोडी आगामी भय या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री संस्कृती बालगुडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके या फ्रेश जोडीची लव्ह केमेस्ट्री भय चित्रपटाच्या निमित्ताने रंगणार आहे. प्रफुल्ल (सिद्धार्थ बोडके) व तानिया (संस्कृती बालगुडे) या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच भावेल. असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. या सिनेमात हटके लोकेशन्स, रोमँटिक गीतांचा नजराणा अनुभवायला मिळणार असून दुबईतील लोकेशन्सवर संस्कृती व सिद्धार्थचं रोमँटिक गीत चित्रीत केलं आहे.  ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय सिनेमात अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर, या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल भातणकर याचं आहे. चित्रपटाचे सहनिमार्ते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निमार्ता आहेत. सहकारी निमार्ते अनिल साबळे आहेत. चित्रपटाची कथाझ्रपटकथा-संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत. १६ डिसेंबरला भय प्रदर्शित होणार आहे. संस्कृती बालगुडे यापूर्वी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पिंजरा, विवाहबंधन या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. तसेच ती शार्टकट, सांगतो ऐका, एक थ्रिलर नाइट अशा अनेक चित्रपटातून झळकली आहे. तसेच ती महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटातदेखील प्रेक्षकांना दिसणार आहे.